Infinity Ad Money Cover Image
User Image
Drag to reposition cover

*काय आहे झिरो बजट नैसर्गिक शेतीचा मोक्षमार्ग*

गेल्या अनेक वर्षापासून झिरो बजेट शेतीची चळवळ जनसामान्यांत रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे प्रयोगशील शेतकरी डाँ सुभाष पाळेकर यांना शेती क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.
सुभाष पाळेकर हे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ. अमरावतीचे.
बोलण्याला शास्त्राचा आणि मातीत हात घालून केल्या कामाचा ठामठोक संदर्भ. कुणाची भिड भाड नाहि जे बोलतात ते ठामपणे मातीचे शास्त्र सम्मत
ते म्हणतात,
शेतीसाठी उत्पादन खर्च लागतोच कशाला?

*"एक देशी गाय पाळा, तीस एकर शेती होईल."* परंपरागत शेतीशी नाळ जोडू शकणारी,
पण त्यापासून पूर्णत: भिन्न,

रासायनिक शेतीपेक्षा वेगळी आणि
सेंद्रिय शेतीपेक्षा कितीतरी पटीनं उपयुक्त अशा

झिरो बजेट शेतीचा प्रयोग आणि प्रसार
गेली अनेक वर्ष ते सातत्यानं करताहेत.

या नव्या आध्यात्मिक शेतीसंबंधात त्यांच्याशी केलेल्या सविस्तर गप्पांचा गोषवारा.

*‘ झिरो बजेट शेती’ म्हणजे काय?*
आतबट्टय़ाच्या शेतीमुळे कर्जबाजारी होऊन शेतकरी एकीकडे आत्महत्त्या करीत असताना, शून्य उत्पादन खर्चावर भरपूर पिकं काढायची हे स्वप्नरंजनच वाटतं. या शेतीसाठी खरंच काहीही खर्च येत नाही का?

- बाहेरून काहीही विकत आणायचं नाही, अतिरिक्त काही खर्च करायचा नाही, जे आपल्याजवळ आहे, तेच शेतीत टाकायचं आणि त्यातून उत्पादन घ्यायचं हेच तर या शेतीचं वैशिष्टय़ आहे. या शेतीसाठी रासायनिक -सेंद्रिय-गांडूळ खतं, कीटकनाशकं, शेणखत. अशा कोणत्याही निविष्टा विकत आणाव्या आणि शेतात टाकाव्या लागत नाहीत. शिवाय नेहमीच्या शेतीच्या तुलनेत या शेतीला केवळ दहा टक्के पाणी आणि दहा टक्के वीज लागते. म्हणजेच पाणी आणि विजेचीही 90 टक्के बचत.

उत्पादन खर्च शून्य, उत्पादनही जास्त, शेतमालाचा उत्तम दर्जा, पूर्णत: पौष्टिक, दर्जेदार, स्वादिष्ट आणि विषमुक्त अन्न! त्यामुळे अर्थातच या मालाला मागणी चांगली आणि भावही उत्तम! शेतकरी कशाला करतील आत्महत्त्या? नेमकी हीच गोष्ट सध्याच्या रासायनिक आणि सेंद्रिय शेतीतून होत नाही.

झिरो बजेट शेतीत मुळात आम्ही जमिनीतलं पाणी आणि पोषक तत्त्वं फारशी वापरतच नाही. या पद्धतीत पिकं जमिनीतलं पाणी आणि पोषकतत्त्वांचा फक्त दीड ते दोन टक्के एवढाच उपभोग घेतात.
बाकी 98 टक्के पाणी आणि पोषक तत्त्वं हवा आणि सौर ऊर्जेतून शोषली जातात.
"भरपूर उत्पन्नाची,
दर्जेदार मालाची,
शून्य खर्चाची,
कर्जमुक्त, चिंतामुक्त, विषमुक्त, कष्टमुक्त, आत्महत्त्यामुक्त,
रोग-किडीमुक्त, दुष्काळमुक्त,
अवकाळी संकटमुक्त अशी ही शेतक:यांना ख:या अर्थानं सुखी, समृद्ध, स्वावलंबी बनवणारी निसर्ग, ज्ञान-विज्ञान व अध्यात्मावर आधारित नवीन कृषी पद्धती आहे.

पण ही शेती नेमकी करायची कशी?

- बीजामृत, जिवामृत, आच्छादन आणि वाफसा ही झिरो बजेट नैसर्गिक शेतीची
चतु:सूत्री आहे. आपल्याकडे हवी फक्त एक देशी गाय.
त्यातून तीस एकर शेती उत्तम प्रकारे करता येते. मात्र त्यासाठी पेरणीच्या वेळी बीजामृत,
नंतर जिवामृता सोबत आच्छादन आणि
वापसा हे तंत्र नीट समजून घेऊन वापरावं लागतं. (पाहा : स्वतंत्र चौकट)

परंपरागत शेतीचंच आधुनिक रूप म्हणजे तुमची बजेट नैसर्गिक शेती का?.

- नाही. या दोन्ही पद्धतीत खूप फरक आहे. आपली परंपरागत भारतीय शेती शेणखतावर आधारित आहे. परंपरागत शेती करायची झाल्यास एक एकर शेतीसाठी 18 बैलगाडय़ा शेणखत असलं तरच त्यातून चांगलं पीक येऊ शकेल. त्यासाठी शेतक:याकडे एकरी उत्पादनासाठी दहा देशी गायीदेखील असायला हव्यात. संपूर्ण देशाचीच शेती या पद्धतीनं करायची म्हटलं तर आज आपल्याकडे साधारण 35 कोटी एकर शेती आहे आणि त्यासाठी 35क् कोटी गायी लागतील. आजच्या घडीला भारतात केवळ आठ कोटी गायी आहेत. त्यामुळे आज परंपरागत शेती करणं नुसतं अशक्यच नाही, तर अव्यवहार्यसुद्धा आहे.

*रासायनिक शेती, सेंद्रिय शेती आणि झिरो बजेट शेती यात मुळात काय फरक आहे?*

- रासायनिक आणि सेंद्रिय; या दोन्ही शेतीची तंत्रं विदेशी आहेत. यातील एकही शेती पद्धत स्वदेशी नाही. रासायनिक शेती किती घातक, विषारी आहे हेदेखील आता सा:यांनाच ठाऊक आहे. मुद्दा उरतो सेंद्रिय शेतीचा. मात्र ही शेती रासायनिक शेतीपेक्षादेखील अधिक घातक, अधिक विषारी व चारपट खर्चिक आहे. भारतीय शेतीची सुपिकता नष्ट करण्याचं हे जागतिक कारस्थान आहे. ‘स्वदेशी’ आणि विषमुक्त पिकांच्या नावाखाली त्यातून अधिकच लूट होते आहे. सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्याचा हा चलाख प्रयत्न आणि प्रयोग सगळीकडे सुरू आहे. देशी कापूस बियाणं आज जवळपास नामशेष झालं आहे. भेंडी, वांगी, गहू, तांदूळ, सोयाबीन, फळधान्यं, भाजीपाला. यांचीही तीच गत असून, ही बियाणीविदेशी मोन्सेंटो सारख्या कंपन्यांच्या हाती गेली आहेत.

*सेंद्रिय शेती विषारी, घातक कशी?*

- थांबा, समजावूनच सांगतो.

सेंद्रिय शेतीसाठी तीन प्रकारच्या निविष्टा लागतात. कंपोस्ट खत, वर्मी कंपोस्ट आणि बायोडायनामिक.
हे सारंच विदेशी तंत्र आहे. कंपोस्ट टेक्नॉलॉजी इंग्लंडमध्ये विकसित झाली.
अल्बर्ट हॉवर्डनं ते तंत्र शोधून काढलं.
कंपोस्ट टेक्नॉलॉजी विकसित झाली युरोपात आणि बायोडायनामिकचा विकास झाला न्यूझीलंडमध्ये.

सेंद्रिय शेतीचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे शेतात आपण जे शेणखत, वर्मीकंपोस्ट टाकलेलं असतं, त्यातला कर्ब 28 अंश सेल्सिअस तपमानाला उत्सर्जित व्हायला सुरुवात होते आणि 38 अंश सेल्सिअस तपमानाला तर कर्ब हवेत मोकळं होतं. त्याची हवेतल्या प्राणवायूबरोबर रासायनिक प्रक्रिया होते व कर्बाम्ल वायू (कार्बन डायऑक्साइड) तयार होतो.
त्याचबरोबर मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड हे अत्यंत घातक असे घटकदेखील तयार होतात. हे तिन्ही घटक ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. त्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होते. ग्लोबल वॉर्मिगमध्येही मोठी वाढ होते.
वर्मी कंपोस्ट व विदेशीजंत आयसेनिक फेटीडाचे( गांडुळ सदृष्य खतरनाक जंतु ) गांडुळ खता मध्ये कॅडमियम, आर्सेनिक, पारा, शिसं यांसारखी अत्यंत खतरनाक रसायनं असतात.
हे विषारी घटक आपल्या अन्नसाखळीत येतातच. परिणामी घातक आजाराला कारणीभुत ठरतात
हा गांडुळ सदृष्य खतरनाक जंत जमीनीतील काडि कचरा , पाला पाचोला,शेणखत खाऊन फस्त करतो व ह्युमस निर्मीतीची प्रक्रीयाच थांबवतो
आपल्या जमिनीची सुपिकता अगोदर नष्ट करायची, उत्पादनक्षमता घटवायची आणि मग उत्पादनवाढीसाठी ‘आमची खतं घ्या’ म्हणून सर्वसामान्य गरीब शेतक:यांच्या माथी ती मारायची
असं हे सेंद्रिय, रासायनिक शेतीचं षडयंत्र आहे.
.आणि
*सेंद्रिय शेती रासायनिक शेतीपेक्षा चौपट महाग कशी?*

- मुळात रासायनिक शेतीच्याच निविष्टा अतिशय महाग आहेत. शिवाय त्यामुळे शेतीचं उत्पादन घटतं.
मात्र सेंद्रिय शेतीचा प्रयोग तर आणखीच उफराटा. यातून जवळजवळ काहीही उत्पादन हाती लागत नाही किंवा अतिशय कमी उत्पादन मिळतं. रासायनिक शेतीसाठी लागणा:या निविदांपेक्षा सेंद्रिय खतांच्या निविदा तिपटी-चौपटीनं महाग आहेत.
गांडुळ सदृष्य खतरनाक जंत आयसेनिक फेटीडाच गांडुलखत 7-8 हजार रुपये टणाचे घरात आहे
बाजारातले दर पाहिले म्हणजे याची खात्री पटेल. उत्पादन खर्च प्रचंड मोठा आणि उत्पादनही नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. नैसर्गिक आपत्तीत सेंद्रिय शेतीतली पिकं तग धरत नाहीत, ती नष्ट होतात. या सा:याच अर्थानं सेंद्रिय शेती घातक आणि आतबट्टय़ाची आहे.

एका देशी गायीच्या माध्यमातून तीस एकर नैसर्गिक शेती करता येते असं तुम्ही म्हणता, ते कसं?

- भारतातले चाळीस लाख शेतकरी हे त्याचं जिवंत आणि सप्रमाण उदाहरण आहे. या पद्धतीच्या शेतीसाठी आपल्याजवळ हवी फक्त एक देशी गाय. या गाईच्या शेण, गोमुत्रच्या आधारे झिरो बजेटची तीसज एकर नैसर्गिक शेती उत्तम प्रकारे करता येते. त्यासाठी इतर खतंही वापरण्याची आवश्यकता नाही. गायीच्या एक ग्रॅम शेणात तब्बल तीनशे ते पाचशे कोटी जिवाणू असतात. जमिनीतल्या जैवइंधनाचं ते विघटन करतात. त्यामुळे पोषक तत्त्वं शोषून घेणं वनस्पतींनाही सोपं जातं.

गायीच्या गोमूत्र आणि शेणापासून तीस एकर शेतीसाठी लागणारं जिवामृत वर्षभर तयार करता येतं. याच गोमुत्रच्या साहाय्यानं तयार होणा:या जिवामृताचा वापर करून चारा लागवड केली तर दहा गुंठे चारा एका गाईला वर्षभर पुरतो. गोमूत्र विकत आणणं हा पर्याय आहेच, पण ही शेती मुळातच ङिारो बजेट असल्यानं गोमूत्र विकत घेणं परवडणारं नाही. त्याऐवजी देशी गाय पाळणं केव्हाही उपयुक्त.

नैसर्गिक शेती शेतक:याला अवकाळी संकट आणि दुष्काळापासून मुक्ती देऊ शकते का?

- असं समजा, थंड हवामानात राहणा:या स्वीडनमधल्या एखाद्या माणसाला नागपूरला आणलं आणि मे महिन्यातल्या रणरणत्या दुपारी बारा वाजता उघडाबंब करून उन्हात बसवलं, तर थोडय़ाच वेळात त्याचं ऑम्लेट होईल. पण हिवाळ्यापासून आणि थंड हवामानाच्या प्रदेशापासून सुरुवात केली, तर ते हवामान त्याच्या अंगवळणी पडेल. या पद्धतीनं नंतर उच्च तपमानातही तो तग धरू शकेल. नैसर्गिक आपत्तीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि उपजत प्रवृत्ती प्रत्येक मनुष्यप्राण्यात आणि वनस्पतीत असते. मात्र रासायनिक आणि सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची ही क्षमताच नष्ट होत जाते. त्यामुळे विपरीत परिस्थितीत पिकं लगेच कोलमडतात. अन्नधान्याचं संकटही त्यामुळे वाढतं आहे. नैसर्गिक आपत्तीतही टिकून राहण्याची क्षमता केवळ नैसर्गिक शेतीतच आहे. शून्य उत्पादन खर्च, अधिक उत्पादन आणि उत्पादित मालाला भाव यामुळे अनेक ठिकाणी शेतक:यांनी स्थलांतर थांबवलं आहे. हा बदल आपण समजून घेतला पाहिजे.

महाराष्ट्रात ङिारो बजेट नैसर्गिक शेती उपेक्षित राहिलेली दिसते. असं का?

- सध्या मी आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे आहे. मला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचं कळल्याबरोबर आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्वत: आपल्या उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांतील अनेक मंत्र्यांसह येथे येऊन माझा सत्कार केला. ‘आमचं राज्य तुम्हाला दत्तक द्यायचं आहे’ असं सांगून येत्या तीन वर्षात संपूर्ण राज्य नैसर्गिक शेतीत बदलायची इच्छा व्यक्त केली, त्यासाठी पैशाची ददात पडू देणार नाही असंही आश्वासन दिलं. एखादा दुस:या राज्यातला मुख्यमंत्री असं काही करतो, तशी इच्छा व्यक्त करतो, हे देशातलं पहिलं उदाहरण आहे. बाकीच्यांना यातून काही कळलं पाहिजे.

तुमच्या शेतीपद्धतीला तुम्ही अध्यात्माशीही जोडलेलं आहे. शेतीचा आणि अध्यात्माचा काय संबंध?

- कुठल्याही जंगलात जा. तिथली आंबा, चिंच इतर कुठलीही झाडं घ्या. तिथे कुठेतरी मानवाची उपस्थिती असते का? तरीही त्या जंगलाची व्यवस्था उत्तम चालते. कुठल्या आधुनिक टेक्नॉलॉजीविना जंगलाचं काही अडतं का? सारं काही निसर्ग करतो आहे, घडवतो आहे. निसर्गच त्याचा निर्माता आहे. त्या जीवनचक्राचा नीट विचार केला, तर मानवाची अत्याधुनिकतेची गुर्मी सहज उतरू शकेल. नैसर्गिक शेती म्हणजे एका अर्थाने आपला मानवी अहंकार विसरून निसर्गाच्या अंतर्भूत शक्तीचं सामर्थ मान्य करणं. आमच्या या शेतीत निसर्गातल्या गोष्टीच आम्ही निसर्गाला देतो. त्या अर्थानं ही शेती म्हणजे एक अध्यात्मच आहे.

नैसर्गिक शेतीची तीन अस्त्रं

1. अग्निअस्त्र

एका मोठय़ा भांडय़ात देशी गायीचं वीस लिटर मूत्र घ्यायचं. एक किलो तंबाखू, अर्धा किलो हिरवी मिरची, अर्धा किलो गावठी लसूण आणि पाच किलो कडुनिंबाची पानं वाटून त्याचा लगदा त्यात मिसळायचा. या सा:या मिश्रणाला पाच वेळा उकळी द्यायची. 24 तासानंतर हे सारं मिश्रण फडक्यानं गाळायचं. शंभर लिटर पाण्यात तीन ते पाच लिटर अग्निअस्त्र मिसळून त्याची पिकांवर फवारणी करायची.

2. ब्रम्हास्त्र

देशी गायीचं वीस लिटर मूत्र घ्यायचं. कडुनिंबाच्या पानांचा तीन किलो, सीताफळ-पपई-डाळिंब-पेरु (आणि मिळाल्यास घाणोरी व पांढरा धोतरा) यांच्या पानांचा प्रत्येकी दोनदोन किलो वाटलेला लगदा त्यात टाकायचा. या मिश्रणाला पाच वेळा उकळी द्यायची. फडक्यानं गाळून चोवीस तासानंतर त्याची झाडांवर फवारणी करता येते. त्याचं प्रमाण आहे शंभर लिटर पाण्यात तीन लिटर ब्रम्हास्त्र

3. निमास्त्र

शंभर लिटर पाण्यात देशी गायीचं पाच लिटर मूत्र टाकायचं, देशी गायीचं पाच किलो शेण, कडुनिंबाच्या पाच किलो पानांचा वाटलेला लगदा या मिश्रणात टाकायचा. 24 तास हे मिश्रण तसंच राहू द्यायचं. एखादी काठी घेऊन हे मिश्रण दिवसातून दोन वेळा चांगलं ढवळायचं आणि पिकांवर त्यांची फवारणी करायची.

महत्त्वाचे- ही सारीच अस्त्रं उत्कृष्ट कीटकनाशकं आहेत. परंतु यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अस्त्रं बनवण्यासाठी देशी गायीचंच शेण आणि मूत्र उपयोगी ठरू शकतं.

‘झिरो बजेट’ :

केवळ शेती नव्हे, तर जनआंदोलन!

शेतीचं तंत्र देणं हे शेतीचं शास्त्र झालं, पण त्यासोबतच नैसर्गिक जीवनशैली देणं हे जन आंदोलन आहे. विषमुक्त अन्न, प्रदूषणमुक्त हवा, पाणी देऊन माणसाला वाचवणं हे जनआंदोलन आहे. रस्त्यावर येऊन गाडय़ा जाळणं, दगडफेक करणं, मोर्चे, घेराव म्हणजे जनआंदोलन नाही. अहिंसक मार्गानं नवनिर्माणाची चळवळ म्हणजे जनआंदोलन. आम्ही तेच करीत आहोत. या मार्गानं लाखो शेतकरी एकमेकांशी जोडले जाताहेत. सातत्यानं चर्चा, बैठका आणि संवैधानिक मार्गाचा अवलंब हा जनआंदोलनाचाच भाग असतो. एखादी व्यवस्था आपण नाकारतो, तेव्हा तिला पर्याय देण्याची जबाबदारीही आपलीच असली पाहिजे.

झिरो बजेट नैसर्गिक शेतीची चळवळ केवळ उपदेश करीत नाही, प्रयोगसिद्ध पर्यायही देते. भारतात आजवर पाच लाख शेतक:यांनी आत्महत्त्या केल्या आहेत, पण ङिारो बजेट नैसर्गिक शेती करणा:या चाळीस लाख शेतक:यांपैकी (त्यातले लाखावर शेतकरी महाराष्ट्रात आणि तीस लाखांच्या वर शेतकरी दक्षिण भारतात आहेत) एकानंही आत्महत्त्या केल्याचं उदाहरण नाही.

नैसर्गिक शेतीची चतु:सूत्री

1. बीजामृत

देशी गाईचं शेण, गोमूत्र, चुना किंवा चुनखडीपासून बीजामृत तयार होतं. कीड, रोग नियंत्रणासाठी बीजामृताचा उपयोग होतो.

2. जिवामृत

गाईचं शेण, गोमूत्र आणि गुळाचा वापर करून जिवामृत तयार केलं जातं. पिकांच्या वाढीसाठी जिवामृत अत्यंत उपयुक्त ठरतं. जिवामृत हे खरं तर खत नसून विरजण आहे. त्यामुळे रासायनिक आणि सेंद्रिय खतांची पूर्णपणो छुट्टी करता येते. मात्र विदेशी किंवा जर्सी गायीचं शेण, गोमूत्र यासाठी अजिबात उपयुक्त नाही.

3. आच्छादन

आच्छादनाचे तीन प्रकार आहेत.

मृदा आच्छादन- नांगरणीसारखी जमिनीची मशागत.

काष्ठा आच्छादन- शेतातल्या पिकांचे जे अवशेष जमिनीवर पडतात, त्याचं जमिनीवर पांघरुण.

सजीव आच्छादन- मुख्य पिकांमधली आंतरपिकं आणि मिश्र पिकं.

आच्छादनामुळे ओलावा जास्त काळ टिकून राहतो तसंच पाण्याचीक् टक्के बचत होते. जमीन सुपीक होते.

4. वाफसा

जमिनीत पाणी आणि हवा यांचं मिश्रण 50-50 टक्के असायला हवं. पाणी केव्हा द्यायचं त्याचंही एक साधं, सोपं टेक्निक आहे. शेतजमिनीतली माती हातात घेऊन मुठीनं दाबून त्याचा लाडू बनवायचा. आपल्या छातीइतक्या उंचीवरून तो खाली सोडायचा. लाडू जर पूर्णपणो फुटला तर जमिनीला पाण्याची गरज आहे. नाही फुटला तर जमिनीला पाणी देण्याला अजून अवकाश आहे असं समजायचं.

डाँ. पद्मश्री कृषीऋषी सुभाषजी पाळेकर
कृषी समूह लातूर.

image
Please log in to like,wonder,share and comment !

What a true inspiration..

I was born in a Dalit family, in a village in Akola. When I was 12, everyone pushed my dad to get me married to a man, 10 years my senior, who lived in Mumbai. My dad didn’t want to, but because of societal pressure, I was married off.
I came here and learned that his family lived in one room in a slum and he didn’t even have a job. I was treated horribly – if there was extra salt in the food I cooked or any mistakes I made, I was beaten up by my in-laws... It was my personal hell.
After 6 months, my father visited me – he couldn’t even recognize me. I was in ragged clothes and I’d lost my smile. He fought with my in-laws and took me home. Telling me to forget about it like a bad dream.
But people started blaming me. I even tried to commit suicide - and they still said that I was giving up because I HAD done something wrong, not the other way around. It was then that I realised that if I was going to be blamed in any case, I’d rather live.
With this new leaf turned, I returned to Mumbai and worked as a tailor. That was the first time I saw what Rs. 100 looked like. I rented a room in Kalyan with my savings and called my family here. We were managing fine - but when we couldn’t afford to save my sister’s life, I realised that I needed to make more money for my family. So I took a government loan and started my own furniture business. It was doing well and we began living a better life.
But there were so many people out there struggling, just like I used to. So I started an NGO to help them get loans. Sometimes, I helped them out of my own pocket and slowly built a good reputation for my social work.
Which is why the workers of Kamani Tubes asked me to help save their company. It was tied up in 140 litigation cases, with a debt of 116 crores. Everyone told me that it was suicide – but 500+ families were starving! So I chose to help, wanting nothing but justice for them in return. I spoke to the finance minister and he got the debt reduced. I gathered a team and shifted factories. Everything I tried was new – but there was no fear left in me.
In 2006, I became the chairman. We were told to pay off the bank loans within 7 years. We did it within 1 and we even managed to pay the workers. Slowly and surely, things changed and today, the turnover is more than we could dream of, I was even awarded the Padma Shri in 2013 for my work. I’ve had an unbelievable journey, from a Dalit Child-Bride to an owner of a multi-million dollar company. It’s been tough - but I’ve made sure to never let the fear of challenges overpower me. I took me a long time to learn that, but now that I have, I can’t choose to face life without having full faith in myself.

”Story of Kalpana Saroj, Chairman Kamani Tubes...The Original Slumdog Millionaire...

https://yourstory.com/2015/02/kalpana-saroj/

Dalit child bride to $112 million CEO: The wonder story of Kalpana Saroj

Dalit child bride to $112 million CEO: The wonder story of Kalpana Saroj

Described as the original slumdog millionaire, Kalpana Saroj overcame impossible odds to reach where she is today. Her story is both heart breaking and faith affirming.
yourstory.com
Please log in to like,wonder,share and comment !
Infinity Ad Money added new photos to Sikkim Airport
1 month ago Translate

Pakyong Airport

Breathtaking photos of Pakyong Airport, East Sikkim.
Photos courtesy : Airports Authority of India

image
image
image
+2
Please log in to like,wonder,share and comment !

It was considered the best photo of this century. A lioness and her cub were crossing the savannah but the heat was excessive and the puppy was in great difficulty walking. An elephant realized that his cub would die and carried him in his trunk to a pool of water walking beside his mother. And we call them wild animals.

image
Please log in to like,wonder,share and comment !
  • 60 posts

  • Male
  • 10/06/67
  • Working at Toofyhub
  • Living in India
  • Located in Mumbai
  • About
  • Owner of www.toofyhub.com